अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर #MeToo ही मोहीम देशातही जोर धरू लागली. याच मोहिमे अंतर्गत अनेक अभिनेत्री आणि महिला पत्रकारांनी लैंगिक छळ, गैरवर्तन, बलात्कार यांसारख्या अन्यायांना वाचा फोडली आहे. यामध्ये आता अभिनेता शेखर सुमन यांच्या मुलाने म्हणजे अध्ययनने देखील त्यांचं मत मांडलं आहे.

अध्ययनने ट्विटरच्या माध्यमातून #MeToo मोहीमेचा आधार घेत दोन वर्षापूर्वीच त्याच्यावर झालेल्या अत्याचारांचं कथन केलं आहे. ‘राज २’ या चित्रपटामध्ये झळकलेला अध्ययन सुमन याचा बॉलिवूडमध्ये म्हणावा तसा वावर नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे त्याला अनेकांनी अपयशी ठरवलं होतं. इतकचं नाही तर त्याची हेटाळणीही केल्याचं त्याने सांगितलं.

‘अध्यययने ट्विटरच्या माध्यमातून त्याचं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. दोन वर्षापूर्वी अनेकांनी मला फ्लॉप समजून माझी खिल्ली उडविली होती. परंतु मी त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. या परिस्थितीत माझ्या जवळच्या माणसांनी याविषयी मला व्यक्त होण्यास सांगितलं होतं. परंतु तेव्हा मी व्यक्त झालो नाही. पण आज #MeToo च्या माध्यमातून व्यक्त होत आहे. मी टू हे खरचं एक चांगलं माध्यम आहे. त्यामुळे अनेक जण त्यांच्यावर झालेल्या अन्यायला वाचा फोडत आहेत’, असं अध्ययन म्हणाला.