अभिनेते आदिल हुसैन हे ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या ट्विटमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. आदिल हुसैन यांनी १८ तारखेला या चित्रपटाबाबत एक ट्विट केले होते, ज्यावरून ते ट्रोल झाले होते. आता त्यांनी आणखी काही ट्विट करून आपली बाजू मांडली असून लवकरच द कश्मीर फाइल्स पाहणार आहे असे म्हटले आहे. माझ्याच्या ट्विटवरील कमेंट्स पाहून मी थक्क झालो. यामुळे ज्यांना त्रास झाला त्यांची मी माफी मागतो, असे ट्विट आदिल यांनी केले आहे. तसेच, चित्रपट पाहिल्यानंतर आपण याबद्दल बोलू, असेही ते म्हणाले.

कबीर सिंग, बेल बॉटम आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटात काम केलेल्या आदिल हुसैन यांच्या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “सत्य सांगितले पाहिजे, पण ते हळुवारपणे मांडले पाहिजे, यात शंका नाही. अन्यथा, सत्य सांगण्याच्या हेतूचे सौंदर्य नष्ट होते. यातून प्रतिक्रिया सुरू होतात प्रतिसाद नाही. अर्थात आम्ही प्रतिक्रियाशील समाजाला भडकावू इच्छित नाही. कला प्रतिक्रियात्मक नसावी,” असे हुसैन यांनी म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्रींनी ‘द कश्मीर फाइल्स’च्या कमाईतील ५० टक्के दान करावी नाहीतर…; करणी सेनेचा इशारा

आदिल यांच्या या ट्विटवर लोकांनी खूप ट्रोल केले. एका युजरने मग काय अॅनिमेटेड चित्रपट बनवावा का? असा सवाल केला आहे. दुसऱ्या एका युजरने मुस्लिमांसारखे बोलू नका. १९९० मध्ये काश्मीरमध्ये आणखी चार नरसंहार झाले.. इस्लामिक जिहादींनी काश्मिरी पंडितांना कसे लक्ष्य केले हे जाणून घेतल्यास तुम्ही हादरून जाल, असे म्हटले आहे. तुम्ही अभिनयात कितीही चांगला असलात तरी तुम्ही मुस्लिम असाल तर जिहादी मनाच्या दहशतीलाच पाठिंबा द्याल, असेही एकाने म्हटले आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ मोफत दाखवणाऱ्यांवर भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, खरा राष्ट्रवाद…

त्यानंतर आता आदिल हुसैन यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. मी “७ ते १८ मार्च या काळात उत्तर कोरियातील एका गावात होतो. १९ तारखेला संध्याकाळी मुंबईत पोहोचलो आणि योगायोगाने अनुपम खेरजींना भेटलो. मी त्यांना सांगितले की मी लवकरच काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहणार आहे. दुसऱ्या दिवसापासून शूटिंगमध्ये व्यस्त झालो आणि अजून चित्रपट पाहिलेला नाही. तर माझे ट्विट कलेबद्दलची माझी सर्वसाधारण टिप्पणी होती. आजही मी यावर ठाम आहे,” असे हुसैन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला त्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रियांनी धक्का बसला. उत्तर देण्यासाठी शब्द शोधण्यात मला थोडा वेळ लागला. मला वाटते की मी हे ट्विट चुकीच्या वेळी पोस्ट केले आहे. त्यामुळे अनेकांचे मन दुखावल्याबद्दल मी माफी मागतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर बोलेन. ट्विटर हे योग्य ठिकाण असेल याची खात्री नाही पण मी प्रयत्न करेन,” असेही आदिल हुसैन यांनी म्हटले आहे.