गायक आणि ‘इंडिय आयडल १२’चा सुत्रसंचालक आदित्य नारायण हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता आदित्यने एक मोठी घोषणा केली आहे. आदित्यने जवळपास १२ रिअॅलिटी शोंचे सुत्रसंचालन केले आहे. आदित्य २०२२ नंतर सुत्रसंचालन करणार नाही असं त्याने सांगितलं आहे. आदित्यने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
आदित्यने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने सुत्रसंचालना विषयी वक्तव्य केले आहे. “२०२२ हे वर्ष माझं सुत्रसंचालक म्हणून शेवटचं वर्ष असणार आहे. त्यानंतर मी सुत्रसंचालन करणार नाही. आता मला काही वेगळं करायचं आहे. मी आधीच काही लोकांना त्यांच काम करणार असं सांगत होकार दिला होता. ते काम मी येत्या काही महिन्यात पूर्ण करणार आहे. इंडस्ट्रीमध्ये माझे चांगले मित्र आहेत, म्हणून जर मी आता हे सगळं मध्येच सोडलं तर मी जहाज मध्येच सोडलं असं वाटेल,” असे आदित्य म्हणाला.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर काय करणार असा प्रश्न विचारता? आदित्य म्हणाला, “पुढच्या वर्षी मी टीव्हीवरून ब्रेक घेईन. एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करायला चांगल वाटतं पण त्यासगळ्या गोष्टी एकत्र केल्यामुळे दमायला होतं. मी १५ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. या बद्दल मी आभारी आहे. पण आता मला पुढे जाण्याची वेळ आली आहे. टीव्हीवर काम करायला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी खूप लहान होतो आणि आता जेव्हा मी हे पुढच्या वर्षी सोडेल तो पर्यंत मी वडील होईल.”
आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट
आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा
आदित्य पुढे म्हणाला, “सुत्रसंचालनामुळे मी मुंबईत घर आणि गाडी घेऊ शकलो. मी सुत्रसंचालन करणार नाही याचा अर्थ मी टीव्हीवर दिसणार नाही असं नाही, तर मी गेम शोमध्ये भाग घेईन किंवा कोणत्या शोचा परिक्षक होईन. एवढे वर्ष सुत्रसंचालनाचे काम करून मी दमलो आहे. माझे पाय दुखायला लागले आहेत. आता माझी खुर्चीत बसायची वेळ आली आहे.”