बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान आणि बॉलिवूडमधील इतर कलाकारांवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. सलमानला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर सलमानने ट्विट करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली होती. त्याच्या या ट्विटला पाठिंबा देत अभिनेता सुनिल ग्रोवरने देखील ट्विट केले होते. पण सुनिलने सलमानला पाठिंबा देणे नेटकऱ्यांना फारसे आवडले नाही. त्यांनी सुनिलला देखील सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'मला सलमान आवडतो आणि मी त्याचा आदर करतो' असे सुनिलने ट्विटमध्ये म्हटले होते. त्याच्या ट्विटनंतर त्यालाही सोशल मीडयावर ट्रोल करण्यात आले होते. पण सुनिलने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे. I love and respect Salman Sir. — Sunil Grover (@WhoSunilGrover) June 21, 2020 सुनिलने त्याला ट्रोल केल्यानंतर पुन्हा एक ट्विट केले आहे. Kahin ab mujhe paid trollers ko kaam pe lagane main maza na aane lag jaye. God please save me from this new amusement. — Sunil Grover (@WhoSunilGrover) June 23, 2020 त्या ट्विटमध्ये त्याने, 'आता मला पेड ट्रोलर्सला कामाला लावण्यास मजा यायला नको. हे देवा मला आता नव्या मनोरंजनपासून वाचव' असे त्याने म्हटले आहे.