ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर याच रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. विनोद दुआ यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. विनोद दुआ यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआ हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या वडिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्लिकाने तिच्या वडिलांचा एक हसणारा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करत मल्लिका म्हणाली की, “तुमच्यासारखं दुसरं कोणीही होणार नाही. माझा पहिला जिवलग मित्र माझे पप्पा. फार कमी लोक तुमच्यासारखे मोठे आणि वैभवशाली जीवन जगतात. नेहमी चांगल्या वेळेसह तुम्ही आव्हानासाठी तयार असायचा. तुम्ही नेहमी चांगली लढाई लढायचा. आमच्यासाठी नेहमी तुम्ही सोबत असायचा. शेवटच्या श्वासापर्यंत एक स्वयंसिद्ध माणूस, महापुरुष म्हणून तुम्ही जगलात. ज्याला कशाचीही भीती वाटत नव्हती.”

“जगातील सर्वोत्तम बाबा असल्याबद्दल धन्यवाद. मला खात्री आहे की तू आणि आई छान कबाब खात असाल आणि मल्लिका एवढी का भांडते याबद्दल गप्पा मारत असाल. माझ्या आयुष्यातील सर्वात धाडसी, निश्चिंत, दयाळू आणि मजेशीर माणूस म्हणून मी तुला ओळखते. एक साधा मुलगा ज्याने शेवटपर्यंत पराक्रम केले आणि पद्मश्री पुरस्कार मिळवला. तुमच्या कमकुवतपणाच्या काळातही तुम्ही भारतीय पत्रकारितेत ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळे आता कोणत्याही पत्रकारावर देशद्रोहाचा खटला चालणार नाही कारण विनोद दुआ त्यांच्यासाठी लढले. जे ते नेहमीच करायचे,” असेही मल्लिका म्हणाली.

हेही वाची : Journalist Vinod Dua : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

“स्वर्ग किती भाग्यवान आहे? माझे संपूर्ण आयुष्य त्यात आहे. आम्ही कायमचे भय आणि दुःखात जगणार नाही. कारण आमच्या आई-वडिलांमुळे आम्ही अभिमानाने आणि कृतज्ञतेने जगू. मी माझ्या नशिबाला काहीही म्हणणार नाही. त्याने मला विनोद आणि चिन्ना दोन्हीही दिले. यापेक्षा दुहेरी भाग्यवान कोणीही नसेल, फारच छान,” असे मल्लिकाने सांगितले.

दरम्यान विनोद दुआ यांच्या पत्नीचेही यंदाच्या वर्षी करोना काळात निधन झाले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत विनोद दुआ आणि त्यांची पत्नी या दोघांनाही याची लागण झाली होती. या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर विनोद हे बरे होऊन घरी परतले होते. मात्र त्यांच्या पत्नीचे १२ जून रोजी निधन झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the death of vinod dua daughter mallika dua wrote in an emotional post on instagram nrp
First published on: 05-12-2021 at 11:13 IST