scorecardresearch

“माझ्या वाढदिवसाच्या आसपास…”, पायल रोहतगीच्या बॉयफ्रेंडने जाहीर केली लग्नाची तारीख

नुकतंच कुस्तीपटू संग्राम सिंहने पायल रोहतगीसोबतच्या लग्नाची घोषणा केली आहे.

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून पायल रोहतगीला ओळखले जाते. गेल्या बऱ्याच काळापासून पायल रोहतगी लग्न करणार असल्याच्या चर्चां सुरु आहेत. पायल ही गेल्या १२ वर्षांपासून कुस्तीपटू संग्राम सिंहला डेट करत आहे. ते दोघेही अनेकदा चांगल्या वाईट काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहताना दिसतात. नुकतंच कुस्तीपटू संग्राम सिंहने पायल रोहतगीसोबतच्या लग्नाची घोषणा केली आहे.

संग्रामने पायलसोबत लग्नाची घोषणा करताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात पायल रडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पायल ही स्वत:ची बाजू मांडताना दिसत आहे. “मी खूप दिवसांपूर्वी संग्रामसोबत साखरपुडा केला आहे. मला त्याच्यासोबत लग्नही करायचे आहे”, असे सांगत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गौप्यस्फोटही केले होते. तिचा हाच व्हिडीओ शेअर करत संग्रमाने लग्नाची घोषणा केली आहे.

संग्रामने नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी संग्राम ट्विट करत म्हणाला, “पायल ही खूप छान मुलगी आहे. आपण दोघे एकमेकांसारखेच आहोत. प्रत्येक जोडप्याने एखादा विचार जपला पाहिजे. आम्ही यंदाच्या मार्च महिन्यात लग्न करण्याचा प्लॅन केला होता. पण आम्हा दोघांच्या कामाच्या कमिटमेंटमुळे आम्ही माझ्या वाढदिवसाच्या आसपास जुलैमध्ये लग्न करणार आहोत. देव सर्वांचे भलं करो.” संग्रामने ट्विटरवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

दरम्यान पायल रोहतगी ही लॉकअपमधील या क्विज टास्कमुळे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिला या दोन्ही प्रश्नांची उत्तर देता न येणं हे सर्वांसाठीच धक्कादायक होतं. कारण ती अनेकदा राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडताना दिसते. पायल रोहतगीला भारताचे राष्ट्रपती कोण हे उत्तर देता आलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After watching payal cry on lock upp about delayed wedding sangram singh announces marriage in july nrp

ताज्या बातम्या