‘अग्निहोत्र’ ही मालिका छोट्या पडद्यावर खूप गाजली. तब्बल १० वर्षांनंतर नव्या कथेसह ‘अग्निहोत्र २’ ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे ‘अग्निहोत्र’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. ‘अग्निहोत्र २’साठीही जोरदार तयारी सुरु झाली होती. मात्र ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या दोन महिन्यांत ही मालिका संपणार आहे.

टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका मागे पडत असल्यानं निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. येत्या ९ मार्चला मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. पण हा शेवटसुद्धा रंजक असणार आहे. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट असणार आहे. या मालिकेची जागा ‘वैजू नंबर १’ ही मालिका घेणार आहे.

आणखी वाचा : रंग माझा वेगळा- मालिकेमुळे यवतमाळच्या मुलीचं मनपरिवर्तन; थाटणार सावळ्या मुलाशी संसार

पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नव्या पिढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडत आहे. या मालिकेत शरद पोंक्षे व रश्मी अनपट यांच्या मुख्य भूमिका आहेत.