बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्व सुंदरी ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोत अभिषेक आणि ऐश्वर्या असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, आता स्वत: अभिषेकने याचे उत्तर दिले आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. अलीकडेच त्यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा फोटो त्यांचा नाही. या विषयी स्वत: अभिषेकने सांगितले आहे.
Her laugh n his Smile say it all #MyLovelies #AbhishekBachchan #AishwaryaRaiBachchan #TBThursday pic.twitter.com/HA4iGi0XhS
— Ruth (@Ruth4ashab) September 15, 2021
आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…
ट्विटरवर व्हायरल झालेला हा फोटो पाहून अभिषेकने कमेंट करत सांगितले की ‘हा फोटो एडिट केलेला आहे.’ दुसऱ्या कोणाच्या फोटोवर अभिषेक आणि ऐश्वर्याचा चेहरा लावण्यात आला आहे. पहिल्यांदा अभिषेकने अशा कोणत्या ट्वीटला रिप्लाय दिली नाही. तर या आधी देखील ट्रोल करणाऱ्यांना अभिषेकने बऱ्याचवेळा सडेतोड उत्तर दिले आहे.
This is a photoshopped image.
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) September 16, 2021
दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्याने २००९ मध्ये लग्न केले. त्या दोघांनी लग्नाआधी जवळपास ६ चित्रपटांमधये एकत्र काम केले आहे. अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द बिग बुल’ या चित्रपटामध्ये दिसला होता. ‘बॉब बिस्वास’ आणि ‘दसवी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.