संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जझबा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडपटात पुनरागमन करणाऱ्या सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनने १ नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. करण जोहर दिग्दर्शित ‘ए दिल हैं मुश्किल’ या आगामी चित्रपटाच्या लंडनमधील चित्रीकरणात व्यस्त असलेल्या ऐश्वर्याने चित्रपटातील सह-कलाकार रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याबरोबर चित्रपटाच्या सेटवर वाढदिवसचा आनंद लुटला. चित्रपटाच्या सेटवर वाढदिवस साजरा करतानाचे ऐश्वर्याचे छायाचित्र करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या खास दिवसासाठी पती अभिषेक, मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय लंडनमध्ये दाखल झाले आहेत. दर वर्षीप्रमाणे हा खास दिवस कुटुंबियांसमवेत साजरा करता यावा म्हणून ऐश्वर्याने चित्रपटाच्या व्यस्त दिनचर्येतून एक दिवसाची सुटी घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Nov 2015 रोजी प्रकाशित
‘ए दिल हैं मुश्किल’च्या सेटवर ऐश्वर्याने साजरा केला वाढदिवस!
ऐश्वर्या राय बच्चनने १ नोव्हेंबरला लंडनमध्ये 'ए दिल हैं मुश्किल' च्या सेटवर वाढदिवस साजरा केला.
Written by दीपक मराठे

First published on: 02-11-2015 at 17:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan celebrates birthday on ae dil hai mushkil sets kjo shares picture