अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. या वर्षात अक्षय अनेक सिनेमांच्या प्रोजेक्टवर काम करतोय. अशातच आता अक्षयचा आगामी सिनेमा ‘ऱक्षाबंधन’ चर्चेत आला आहे. या सिनेमात अभिनेत्री भूमि पेडणेकर झळकणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय.अक्षय कुमारने स्वत: सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’ सिनेमाचे दिग्दर्शक एल राय आणि भूमि पेडणेकरसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिलीय.

या फोटोत तिघेही एका उंच ठिकाणावर बसल्याचं दिसून येत आहेत. तर तिघेही दिलखुलास हसत असल्याचं पाहायला मिळतंय. हा फोटो शेअर करत अक्षय कॅप्शनमध्ये म्हणाला, “जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा ते स्पष्ट दिसून येतं. रक्षाबंधनमध्ये भूमि पेडणेकरला घेतल्याचा खूप आनंद होतोय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

हे देखील वाचा: मार्वल स्टुडिओच्या ‘मिस मार्वल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार?; नेटकऱ्यांमध्ये चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अभिनेत्री भूमि पेडणेकरने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करत ती म्हणाली, “खूपच खास सिनेमा आणि खूपच खास रीयूनियन. मी माझ्या दोन आवडत्या क्रिएटिव्ह पावर हाउस व्यक्तींसोबत काम करण्यासाठी उत्साही आहे. या खास सिनेमाचा मला भाग बनण्याची संधी मिळाली यासाठी मी आभारी आहे.” अशा आशयाचं कॅप्शन देत भूमिने आनंद व्यक्त केलाय.

अक्षय कुमारने गेल्यावर्षीच या सिनेमाची घोषणा केली होती. तर या वर्षात अक्षय अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. यासोबतच अक्षय ‘बेल बॉटम’, ‘राम सेतु’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’ या सिनेमात झळकणार आहे.