हाँगकाँगच्या प्रेक्षकांनाही मिळणार ‘गुड न्यूज’

वाचा, हाँगकाँगच्या प्रेक्षकांना कधी पाहता येणार गुड न्यूज

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गुड न्यूज’ हा विनोदीपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तिकीटबारीवर १७.५० कोटी रुपयांची घसघशीत कमाई करणाऱ्या या चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यानंतर आता हा चित्रपट हॉगकॉंगमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन हा चित्रपट आता हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२० ला हाँगकाँगमधील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत करण्यात आली आहे. तर दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे.

सरोगेसीवर आधारित हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात २०४.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अक्षय त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाकडे वळला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ स्क्रीन शेअर करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar film good newwz release in hongkong ssj

ताज्या बातम्या