बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे पत्नीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. एक आदर्श पती, वडील आणि मुलगा अशा सर्व जबाबदाऱ्या तो उत्तम पार पाडतो. त्याचं सर्वांवर जीवापाड प्रेम आहे, पण यापैकी एकाचाही फोटो त्याच्या पाकिटात नसतो. होय, हे खरं आहे. त्याच्या पाकिटात एका दिग्गज कलाकाराचा फोटो आहे. तो कलाकार जगज्जेता आहे. विनोदाचा बादशाहा असलेल्या चार्ली चॅपलिन यांचा फोटो अक्षयच्या पाकिटात असतो. अक्षयनंच हे सांगितलं आहे.

Tumhari Sulu Teaser: विद्या बालन म्हणते, ‘हॅलो… मैं सुलु बोल रही हूँ!’

‘माझ्या पाकिटात नेहमीच प्रसिद्ध विनोदवीर चार्ली चॅपलिन यांचा फोटो असतो. कधीही आयुष्यात कठीण प्रसंग आला की मला चार्ली यांचे विचार आठवतात. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास आहे. ते आणि त्यांचे सिनेमे हे माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. एवढा मोठा कलाकार असूनही त्यांची नम्रता खूप काही शिकवून जाते, असे अक्षयने एका मुलाखतीत सांगितले.

‘खतरों के खिलाडी’ आणि ‘मास्टर शेफ ऑफ इंडिया’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केल्यानंतर अक्षय कुमार आता परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ५’ या कॉमेडी शोद्वारे तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. शोचे हे पाचवे पर्व आहे. त्यात अक्षय परीक्षक असणार आहे. या शोमध्ये अक्षयसह मल्लिका दुआ, जाकीर खान आणि हुसेन दलाल हेही परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. सुनील पाल, एहसान कुरेशी, भारती सिंग, राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा यांसारखे नामांकित कॉमेडियन्स ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ने मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षयच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. सध्या तो ‘पॅडमॅन’ आणि ‘गोल्ड’ या दोन सिनेमांच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे.