अक्षय कुमारच्या ‘एन्टरटेन्मेंट’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात तब्बल ३५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.१६ कोटी तर शनिवार आणि रविवारी या दिवशी अनुक्रमे ११.५३ व १४ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली असली तरी, येणारे काही दिवस ‘एन्टरटेन्मेंट’च्या यशाच्या दृष्टीने महत्वाचे असतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
एक कुत्रा जो माणसाचे आयुष्य जगतो आणि एक माणूस जो कुत्र्याचे आयुष्य जगतो, अशा मध्यवर्ती संकल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे. अक्षय हा लक्षाधीश बापाचा मुलगा दाखवला असून त्याच्या वडिलांनी सर्व संपत्ती एका कुत्र्याच्या नावावर केल्याचे त्याला कळते. इथूनच सुरुवात होते ती अक्षयच्या विनोदी संघर्षाला. यात तमन्ना भाटीयाने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. ‘इट्स एन्टरटेन्मेंट’मध्ये मिथुन चक्रवर्ती, प्रकाश राज, सोनू सूद, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक आणि हितेन तेजवानी यांच्याही भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
अक्षय कुमारच्या ‘एन्टरटेन्मेंट’ची ३५ कोटींची कमाई
अक्षय कुमारच्या 'एन्टरटेन्मेंट' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात तब्बल ३५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.१६ कोटी तर शनिवार आणि रविवारी या दिवशी अनुक्रमे ११.५३ व १४ कोटींचा गल्ला जमवला.
First published on: 11-08-2014 at 05:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumars entertainment crosses rs 35 crore mark