बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आहे. आलियाच्या वाढदिवशी तिच्या आजी-आजोबांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे भावूक झालेल्या आलियाचा व्हिडिओ यासाठी निमित्त ठरला आहे. आलियाची बहीण पुजा भट हिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये आलियाचे आजोबा एन. रझदान आपल्या नातीसाठी व्हायोलिनवर ‘बर्थडे साँग’ ची सुरावट वाजवताना दिसत आहेत. आलियाची आजीही माऊथ ऑरगनवर ही सुरावट वाजवत आहे. आजी-आजोबांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे आलिया भावूक झाली. १५ मार्चला आलियाचा २३ वा वाढदिवस होता.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2016 रोजी प्रकाशित
आजी-आजोबांनी दिलेल्या वाढदिवसाच्या ‘त्या’ भेटीने आलियाला रडू कोसळले
आजी-आजोबांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे आलिया भावूक झाली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 23-03-2016 at 08:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt cry on her birthday after watching birthday wishes from her grandparents