दोन-दोन चित्रपटांचे प्रमोशन, शुटिंग आणि डबिंगमध्ये व्यस्त असलेल्या अलिया भटला सततच्या धावपळीचा परिणाम अखेर जाणवू लागला आहे. अतिधावपळीमुळे थकलेल्या आणि तापाने आजारी असलेल्या अलिया भटला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ‘हायवे’ चित्रपटात काम करणे अलियासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारे असल्याचे सांगत तिची जवळची मैत्रीण म्हणाली, ‘हायवे’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी अलिया संपूर्ण देशात फिरली, सध्या ती ‘२ स्टेट’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त आहे. हे सर्व इथेच थांबत नाही. ‘२ स्टेट’ चित्रपटाचे डबिंग करत असलेली अलिया रात्रपाळीमध्ये शशांक खैतानच्या ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटाचे चित्रीकरण करते. २० वर्षाच्या या मुलीवर एकाच वेळी सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा भार असहाय्य झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या अलियाच्या प्रकृतीत सुधार होत आहे. या विषयी बोलताना तिची मैत्रीण म्हणाली, तिला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका जागेवर न बसणाऱ्या उत्साही अलिया भटला आराम करणे कठीण जात आहे. असे असले तरी सध्या तिने आपल्या धावपळीच्या जीवनशैलीचा वेग कमी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
अलिया भट आजारी?
दोन-दोन चित्रपटांचे प्रमोशन, शुटिंग आणि डबिंगमध्ये व्यस्त असलेल्या अलिया भटला सततच्या धावपळीचा परिणाम अखेर जाणवू लागला आहे.

First published on: 06-03-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt is unwell