सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची. आलिया आणि रणबीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र लग्नाची तारीख अद्याप समोर आली नव्हती. पण आता आलियाचे काका रॉबिन यांनी लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे. एका वेबसाइटशी बोलताना महेश भट्ट यांचे सावत्र भाऊ रॉबिन भट्ट यांनी सांगितलं की, आलिया आणि रणबीर येत्या १४ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. १३ एप्रिलला आलियाच्या मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. आलिया आणि रणबीर यांचं लग्न कपूर फॅमिलीच्या आरके हाऊसमध्ये होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जेव्हा रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांना या दोघांच्या लग्नाबाबत जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ‘देवालाच माहीत हे दोघं लग्न कधी करणार’ अशी प्रतिक्रिया दिली होती. याशिवाय काही मीडिया रिपोर्ट्सनी आलिया आणि रणबीर १५ एप्रिल किंवा १७ एप्रिलला लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता आलियाच्या काकांनी १४ एप्रिलला हे दोघंही लग्न करणार असल्याचं म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.