काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डाचे प्रणयदृश्य असणारे फोटो सोशल साइट्सवर प्रदर्शित झाले होते. पण, हे फोटो खोटे असल्याचे आलियाने सांगितले आहे.
करण जोहरच्या ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ चित्रपटात रणदीप हुड्डासोबत झळकणार आहे. याच चित्रपटातील काही प्रणयदृश्य असलेले फोटो नुकतेच प्रदर्शित झाले होते. मात्र, आलियाने ट्विटरद्वारे तिच्या चाहत्यांना हे फोटो खोटे असून त्यांमध्ये ती आणि रणदीप नसल्याचे सांगितले आहे. आलिया सध्या ‘२स्टेट्स’  या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.