scorecardresearch

“चित्रपट चालणार की नाही हे मला…” ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर आलिया भट्टचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शनानंतर आलियाचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

“चित्रपट चालणार की नाही हे मला…” ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर आलिया भट्टचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. कमाईचे बरेच विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. समीक्षकांनीही या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने जवळपास ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशातच या चित्रपटाच्या यशानंतर आलिया भट्टने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे.

एकीकडे या चित्रपट ब्लॉकबस्टर मानला जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांवरून नवा वाद सुरू आहे. चित्रपटाबाबत अशाप्रकारच्या उलट- सुलट चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध झालेले रिव्ह्यू आपण कधीच वाचत नाही असं आलियाने नुकतंच एका मुलाखतीत म्हटलं आहे.

आणखी वाचा- अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्रमधील शाहरुखच्या कॅमिओची तुलना केली थेट अ‍ॅव्हेंजर्सच्या ‘आयर्न मॅन’शी; म्हणाला…

आलिया म्हणाली, “मी रिव्ह्यू कधीच वाचत नाही कारण ते फक्त लिहिणाऱ्या व्यक्तीचं मत असतं. माझ्या पहिल्याच चित्रपटापासून मला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच समजतं की हा चित्रपट चालणार आहे की नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला ते जाणवतं. मी लोकांना भेटून त्याबाबत विचारते. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेते. त्यांना नेमकं काय वाटतं हे त्यांना विचारते. पण त्यासाठी मला रिव्ह्यू वाचावे असं वाटत नाही.”

आणखी वाचा-“विचार करून बोलण्याची सवय लागली तर…” बॉयकॉट ट्रेंडवर गोविंदा यांची स्पष्ट प्रतिक्रिया

दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग ‘शिवा’ रिलीज झाला आहे. यानंतर चित्रपटाचे आणखी दोन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा पहिलाच चित्रपट आहे ज्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र दिसले आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या