सध्या कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडपासून ते मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी २०२० या वर्षात लग्नबंधनात बांधले गेले आहेत. यामध्येच आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीदेखील लवकरच सप्तपदी चालणार आहे. निहारिका कोनिडेला हिच्या घरी सध्या लग्नाची धामधुम सुरु असून तिच्या लग्नात चिरंजीवी आणि अल्लू अर्जुन सारख्या बड्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यातील या दिग्गज कलाकारांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चिरंजीवी आणि अल्लू अर्जुन यांच्या डान्सचा व्हिडीओ एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही सुपरस्टार अफलातून डान्स करताना दिसत आहेत. सध्या निहारिकाचा लग्न सोहळा उदयपूरमध्ये सुरु आहे. या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.

हा व्हिडीओ निहारिकाच्या मेहंदी सोहळ्यातील आहे. या सोहळ्यात अल्लू अर्जुन व चिरंजीवी ‘बांगरु कोडी पेट्टा’ या गाण्यावर थिरकत आहेत. निहारिका व्यावसायिक चैतन्य जोंनालागद्दासोबत लग्न करणार आहे.