दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी निर्बंध लागू केले जात आहेत. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. करोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता हा चित्रपट ७ जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Video: ‘पुष्पा’ चित्रपटातून हटवण्यात आलेला ‘तो’ सीन झाला प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.