दाक्षिणात्या स्टाइलीश स्टार म्हणून अभिनेता अल्लू अर्जुन ओळखला जातो. नुकताच त्याचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्यांची रील्स आणि डायलॉग्स व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. ” ‘पुष्पा’ या चित्रपटात पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,” अशी तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

तर, “चित्रपट निर्माता व अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, एवढचं काय तर या पुढे असं चित्रीकरण जर करण्यात आलं तर ते आधीच थांबवलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं, जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही,’ अशी मागणी सुभाष साळवे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

आणखी वाचा : “गँगस्टर अबु सालेमच्या घरातली सगळी काम करावी लागत होती…”, अभिनेत्री मोनिका बेदीने केला होता धक्कादायक खुलासा

पुष्पा या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाची कथा ही लाल चंदनाच्या तस्करीवर आधारीत आहे. या चित्रपटातून लोकप्रिय अभिनेत्री समांथाने तिच्या करिअरमधलं पहिलं आयटम सॉंग केलं आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जातं आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun s pushpa ban demanding letter to home minister of maharashtra dcp
First published on: 21-01-2022 at 11:04 IST