scorecardresearch

Video : लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रसिद्ध गायिकेची पँट फाटली अन्…

या व्हिडीओत तिच्यासोबत झालेला सर्व प्रकार स्पष्ट दिसत आहे.

बॉलिवूडसह हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री, गायक यांसह सर्वचजण त्यांच्या लूक आणि कपड्यांमुळे चर्चेत असतात. एखाद्या पार्टीत किंवा पुरस्कार सोहळ्यात त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे ते कायमच सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. पण कधीकधी याच अभिनेत्री त्यांच्या कपड्यांमुळे Oops Moment च्या शिकार होताना पाहायला मिळते. असाच प्रकार अमेरिकेतील प्रसिद्ध गायिकेसोबत घडला आहे.

अमेरिकन गायिका केटी पेरी ही नुकतंच Oops Moment ची शिकार झाली. केटी ही अमेरिकन आयडॉल या कार्यक्रमातील लाइव्ह शो दरम्यान परफॉर्म करत असताना तिची पॅन्ट फाटली. याचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत झालेला सर्व प्रकार स्पष्ट दिसत आहे.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेने केले गुपचूप लग्न? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागील सत्य समोर

अमेरिका आयडॉल हा एक प्रसिद्ध रिअॅलिटी शो आहे. या रिअॅलिटी शोदरम्यान केटी ही लिओनेल रिची आणि ल्यूक ब्रायनसोबत गाणे सादर करत असल्याचे दिसत आहे. यावेळी कॅटीने लाल रंगाची लेदर पँट आणि प्रिंटेट टॉप परिधान केला होता. ती फार जोशात हे गाणे सादर करत होती. हे गाणं सादर करत असतानाच ती खाली वाकली आणि त्याचवेळी तिची पॅन्ट फाटण्याचा आवाज आला.

पँट फाटल्यानंतरही तिने गाणे गायचे थांबवले नाही. तिने क्रू मेंबर्सला आवाज देत तुमच्याकडे चिकटपट्टी आहे का? असे विचारले. त्यानंतर क्रू मेंबर्सनेही चिकटपट्टी आणत ती फाटलेल्या ठिकाणी लावली. दरम्यान इतकं झालेले असतानाही तिने तिचे गाणे थांबवले नाही, याचे नेटकरी कौतुक करत आहे. मात्र त्यासोबत पँट फाटल्यामुळे तिला ट्रोलही केले जात आहे.

VIDEO: क्रिस रॉकने ६ वर्षांपूर्वी ऑस्करदरम्यान उडवली होती विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली, म्हणाला “जॅडा ही…”

दरम्यान यापूर्वी २०१८ मध्ये तिच्यासोबत अशीच घटना घडली होती. यावेळी कॅटीने वन स्लीव्ह जम्पसूट परिधान केला होता. मात्र अचानक शो दरम्यान तो फाटला. त्यावेळीही तिला Oops Moment चे शिकार व्हावं लागलं होतं. कॅटी ही २०१७ पासून अमेरिकन आयडल या टीव्ही शोची परिक्षक आहे. या शो दरम्यान कॅटीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: American singer katy perry suffers wardrobe malfunction during performance gets her pants ripped nrp