बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन मन लावून काम करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. यावेळी अमिताभने चार वेगवेगळ्या भाषांमधले चार जाहिरातपट केवळ दोन दिवसांत पूर्ण केले आहेत.
अमिताभ आपल्या फेसबुक अकाऊंटवरील पोस्टमध्ये लिहितो – “एकदाचे चार वेगवेगळ्या भाषांमधील चार जाहिरातपट दोन दिवसांत पूर्ण केले – तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम… आणि या भाषांमधील संवाद देखील स्वत: म्हणालो….!! सर्वांचा अभिमान ही त्यांची मातृभाषा भाषा असते !!”
अलिकडेच अमिताभने दक्षिणेतल सुपरस्टार शिवाजी गणेशनचा मुलगा प्रभू, कन्नड अभिनेता राज कुमारचा मुलगा शिवा आणि नागेश्वरचा मुलगा नागार्जुन यांच्याबरोबरचे एका दागिन्याच्या ब्रॅण्डसाठीचे जाहिरातीचे शुटिंग पूर्ण केले.
या महानायकाचा उत्साह आणि कामाप्रतीची आवड पाहून नागार्जून थक्क झाला. नागार्जून म्हणतो, “ते महान आहेत… मी त्यांच्यामुळे आश्चर्यचकीत झालो आहे. या वयातसुद्धा त्यांचा उत्साह आणि काम करण्याची इच्छा खूप आहे, त्यांच्या डोळ्यात तेज आहे. त्यांच्याबरोबर काम करताना मला नेहमीच शिकायला मिळते.”
तेलगू सुपरस्टार नागार्जुनने याआधी अमिताभबरोबर ‘खुदा गवाह’मध्ये काम केले आहे. नागार्जुन म्हणतो, जवळजवळ २० वर्ष झाली, तरीही ते अजून तसेच आहेत उत्साही, सकारात्मक विचार करणारे आणि खूप काम करणारे.
अमिताभ म्हणाला, माझा या सर्वांच्या वडिलांप्रती असलेला आदर आणि आमचा एकमेकांमधला स्नेहभाव खरच असामान्य आहे… त्या सर्वांनी माझ्या काही चित्रपटांचे त्यांच्या भाषेत रिमेक केले असून मी सुद्धा तसेच केले आहे.
अमिताभने सोशल साईटवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे, “कल्याण ज्वेलर्ससाठीच्या जाहिरातीचा त्याचा कास्ट आणि क्रूबरोबरचा कामाचा दिवस सकाळी ७ वाजता सुरू होत असे आणि रात्री ११ वाजता संपत असे. … खूप मजा आली. थकलोय ? नाही …भाग मिल्खा भाग मधले चांगले संगीत ऐकले… ‘ओ रंगरेझ’ आणि मेरे यार…”
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
अमिताभने दोन दिवसांत केले चार वेगवेगळ्या भाषांतील चार जाहिरातपटांचे काम पूर्ण
बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन मन लावून काम करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. यावेळी अमिताभने चार वेगवेगळ्या भाषांमधले चार जाहिरातपट केवळ दोन दिवसांत पूर्ण केले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 17-07-2013 at 06:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan completes four films in two days in 4 different languages