‘बॉलिवूड’चा अनभिषक्त सम्राट अमिताभ बच्चन याने आजही आपणच बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘फेसबुक’वर अमिताभने एक नवा विक्रम केला आहे. ‘फेसबुक’वर मंगळवारी अमिताभला ‘लाईक’ करणाऱ्यांच्या संख्येने एक कोटींचा आकडा पार केला. बॉलिवूडमध्ये ‘फेसबुक’वर सर्वाधिक ‘लाइक’ मिळालेला अमिताभ हा एकमेवाद्वितीय अभिनेता ठरला आहे.
‘ज्येष्ठ’ असूनही अमिताभने बॉलिवूडमधील तरुण अभिनेते आणि अभिनेत्री यांना मागे टाकत ‘फेसबुक’वर आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. एक कोटींहून अधिक ‘लाइक’ मिळविणे ही काही सोपी गोष्ट नाही. आमिर खान आणि सलमान खान हे दोघेही ‘फेसबुक’वर अमिताभच्या मागे आहेत.
अमिताभने २१ ऑगस्ट २०१२ रोजी ‘फेसबुक’वर आपले अकाऊंट सुरू केले होते. चाहत्यांच्या उदंड प्रतिसादाबद्दल अमिताभने आभार मानले असून ‘एक करोड, आप सभी का शुक्रिया, खुशी से अभिभूत हूँ, दिन की क्या शानदार शुरुवात हुई है’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ‘ट्विटर’वरही अमिताभच्या ‘फॉलोअर्स’ची संख्या ८१ लाख असून येथेही कोटींचा पल्ला लवकरच पार होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘कोटय़धीश’अमिताभ!
‘बॉलिवूड’चा अनभिषक्त सम्राट अमिताभ बच्चन याने आजही आपणच बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘फेसबुक’वर अमिताभने एक नवा विक्रम केला आहे.

First published on: 06-03-2014 at 06:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan crosses 10 million likes on facebook