छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे १४ वे पर्व सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पर्वालाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळताना पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. त्यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातच अमिताभ बच्चन आणि स्पर्धकामधील एक भावूक क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. याचा एक प्रोमो समोर आला आहे.

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत अमिताभ बच्चन हे भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केबीसी १४ व्या पर्वात सहभागी झालेल्या एका महिला स्पर्धकाने बिग बी अमिताभ बच्चन यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी अनेक स्पर्धकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ज्योतीमर्य मल्लिक असे या महिला स्पर्धकाचे नाव आहे. ही महिला स्पर्धक ओडिशामधील रहिवाशी आहे. त्या पोस्ट ऑफिसमध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून काम करत आहेत. ज्योतीमर्य यांनी अमिताभ यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी अमिताभ यांना वाचून दाखवलं.
आणखी वाचा : ‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन? कपड्यांवरही होतो लाखोंचा खर्च

पत्रात नेमकं काय?

आदरणीय अमिताभ बच्चन जी, सप्रेम नमस्कार… आम्ही कधी तुमच्यासारखे बनू शकतो की नाही याबद्दल आम्हाला माहिती नाही. पण तुम्ही आमच्यापैकीच एक आहात, हे तुम्ही सिद्ध केलं आहात. ज्याप्रकारे तुम्ही आम्हाला आदरपूर्वक हॉटसीटवर बसण्यासाठी मदत करता, आमचे अश्रू पुसता आणि तो टिश्यू स्वत:च्या खिशात ठेवता. तुम्ही प्रेक्षकांमध्ये जाता आणि त्यांच्यातील एक होता. कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो की असा महानायक शतकातून एकदाच होतो, असे पत्र ज्योतीमर्य यांनी वाचून दाखवलं.

हे पत्र ऐकल्यावर अमिताभ बच्चन भावूक होतात. ‘तुम्ही आता मला भावूक केलंत’, अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “काही गोष्टी करायच्यात पण…” अमिताभ बच्चन यांची बॉयकॉट ट्रेंडवर पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ते चित्रपटांसह सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतात. त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे ते सर्वत्र प्रसिद्ध आहे. कौन बनेगा करोडपती हा भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. हा रिअॅलिटी शो भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे १३ पर्व यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. तर १४ वे पर्व चांगलाच गाजत आहे.