बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी त्यांच्या जलसा या घराच्या बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतात. याकारणास्तव चाहतेही अमिताभ यांची एक झलक दिसावी यासाठी दर रविवारी मोठ्या संख्येने त्यांच्या घराच्या बाहेर गर्दी करतात. परंतु ‘या रविवारी प्रकृती अस्वस्थ्यामुळे चाहत्यांची भेट घेता येणार नाही’, अशी माहिती अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. अमिताभ यांच्या या ट्विटनंतर चाहते प्रचंड चिंतेमध्ये होते. प्रत्येकाने सोशल मीडियाचा आधार घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे चाहत्यांचं हे प्रेम आणि काळजी पाहून बिग बी प्रचंड भावुक झाले आणि त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“प्रत्येक रविवारी मी आपल्या भेटीला येत असतो. मात्र एक दिवस माझी भेट होणार नाही, किंवा माझी प्रकृती ठिक नसल्याचं समजल्यानंतर तुम्ही माझ्याप्रती जे प्रेम दाखवलंत ते पाहून मी भारावून गेलो आहे. तुम्हा साऱ्यांचा मी मनापासून आदर करतो”, असं ट्विट अमिताभ यांनी केलं आहे. अमिताभ यांच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी बिग बींना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. अनेक वेळा ते सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांचं मत व्यक्त करत असतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता केवळ पडद्यावरच नाही तर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan not meet fans on sunday due to illness now write emotional letter
First published on: 06-05-2019 at 13:03 IST