अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करुन करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. बिग बींना करोनाची लागण झाल्यानंतर कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला असून प्रत्येक जण ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींना लवकर बरे व्हा असंही म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”आदरणीय अमिताभ बच्चन जी!!! तुम्ही जीवनात प्रत्येक कठीण प्रसंगावर तुमच्या धैर्याने मात केली आहे. त्यामुळे मला आणि संपूर्ण देशाला विश्वास आहे की तुम्ही करोनाविरुद्धची लढाईदेखील जिंकाल. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत”, असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे.

“तुम्ही लवकर ठीक व्हाल अमित अंकल. तुम्ही बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन”, असं सोनम कपूर म्हणाली. तिच्याप्रमाणेच बोनी कपूर, रविना टंडन यांनीदेखील ट्विट करुन लवकर बरे व्हा असं म्हटलं आहे.


“तुम्ही एक लढवय्ये आहात लवकर बरे व्हा”, असं बोमण इराणी यांनी म्हटलं आहे. तर “तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावात यासाठी देशातील सगळी जनता देवाकडे प्रार्थना करत आहे सर. ताकद आणि धैर्य यांचं दुसरं नाव तुम्ही आहात”, असं भूमि पेडणेकर म्हणाली.


सोनम, रविना, भूमि आणि अनुपम खेर यांच्या व्यतिरिक्त रितेश देशमुख, बिपाशा बासू, कृति सेनॉन, तापसी पन्नू, अर्शद वारसी,राजू श्रीवास्तव, कंगना रणौत या कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींना ,लवकर बरे व्हा,, असं म्हटलं आहे.

दरम्यान, बॉलिवूडप्रमाणेच मामूटी, महेश बाबू या दाक्षिणात्य कलाकारांनीही बिग बी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan tests positive for covid 19 taapsee pannu riteish deshmukh rajkummar rao kriti sanon pray for his quick recovery ssj
First published on: 12-07-2020 at 08:42 IST