उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी राज्यातील उद्योजकांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्यासह भेटीदरम्यान विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. याबाबतची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंबंधित ट्वीट केलं आहे.

आणखी वाचा – आठवड्याभरानंतरही रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, आठ दिवसांमध्येच कोट्यवधींची कमाई

रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले. तसेच अदानी समूहाने पीपीपी मॉडेलवर आधारित वैद्यकीय संस्था उभारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.

अमोल मिटकरी यांनी योगी आदित्यानाथ यांचा मुकेश अंबानी यांच्याबरोबरचा फोटो ट्विट केला आहे. “राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले.” असं अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. तसेच हे ट्विट करताना योगी तेरा खेल निराला असं हॅशटॅग त्यांनी वापरलं आहे.

आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंनी गोव्याच्या रस्त्यावर बसून काढले फोटो, मराठमोळ्या जोडप्याच्या साधेपणाने वेधलं लक्ष

उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वादावर अमोल मिटकरी यांनी हे ट्विट केलं आहे. उर्फी व चित्रा वाघ यांच्या वादामध्ये काही राजकीय मंडळींनी आपली प्रतिक्रिया दिली. उर्फीच्या फॅशनवरुन सुरू झालेल्या या वादाला राजकीय वळण मिळालं आहे.