बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये अमृतानं तिचं रिलेशनशिप आणि लग्नाबाबत बरेच खुलासे केले आहेत. यासोबतच तिने लग्नाच्या ८ वर्षांनंतर लग्नाचा अल्बम देखील शेअर केला आहे. ज्यात नवरीच्या वेशातील अमृता खूपच सुंदर दिसत आहे. एवढंच नाही तर अमृतानं आता पती आरजे अनमोलबद्दलही काही खुलासे केले आहेत.

अमृतानं पती आरजे अनमोलनं लग्नाआधी तिला अभिनय करिअर सोडण्यास सांगितलं होतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली, ‘हे खरं आहे. त्यावेळी मी अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर मला स्क्रीनवर किसिंग सीन आणि लव्ह मेकिंग सीन करण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे मी लग्न करून खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करावं असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं त्यावेळी माझं अभिनय करिअर सोडण्यास सांगितलं आणि त्याचं बोलणं ऐकून मी पूर्णतः खचले होते. पण एक-दोन दिवसांतच त्याला त्याचा हा सल्ला चुकीचा वाटू लागला होता आणि त्यानं यासाठी माफी मागितली होती.’

आणखी वाचा- The Kashmir Files Day 5 Collection: बॉक्स ऑफिसवर ‘द कश्मीर फाईल्स’चा धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

View this post on Instagram

A post shared by AMRITA RAO ?? (@amrita_rao_insta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता रावनं २०१४ साली आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केलं होतं. ही गोष्ट त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवली होती. एवढंच नाही तर अमृतानं तिच्या लग्नाचा मेकअप देखील स्वतःच केला होता. जर एखाद्या मेकअप आर्टिस्टला बोलवलं तर लग्नाबाबत लोकांना समजेल. लग्नानंतर बरीच वर्ष अमृता राव कोणत्याही चित्रपटात दिसली नव्हती. २०२० मध्ये अमृतानं मुलगा वीरला जन्म दिला. ती त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.