झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजेरी लावली. अमृता फडणवीस यांचा झी मराठीवरील भाग नुकतंच प्रसारित करण्यात आला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बस बाई बस या कार्यक्रमात विविध राजकीय घटनांवर अमृता फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी दिलखुलास पद्धतीने उत्तर दिली. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळाली. राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. नुकतंच ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला.

“पतीने गळा पकडलाय असं वाटतं म्हणून…” अमृता फडणवीसांनी सांगितलं हातात मंगळसूत्र घालण्यामागचं खरं कारण

त्यावर उत्तर देताना अमृता फडणवीस थोड्याशा गोंधळलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, ‘माहिती नाही. ते मुख्यमंत्री होतील, हेच मला कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळे पंतप्रधान तर वाटूच शकत नाही.’

“पंतप्रधान पद हे असे आहे की त्यावेळी देशाच्या हितासाठी काय चांगलं आहे हे लक्षात ठेवून करावं. आता सध्या नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणीही देशासाठी चांगले नाही हे मला समजतंय. पुढे १० ते २० वर्षे गेल्यानंतर तेव्हा त्या पदासाठी कोण पात्र असेल हे मी आताच सांगू शकत नाही. त्यामुळे ते पंतप्रधान होतील की नाही हे मला माहिती नाही”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

‘देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायला हवे होते का?’ या प्रश्नावर अमृता फडणवीसांचे उत्तर, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंचे नाव समोर आल्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता फडणवीसांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर सुबोध भावे यांनीही त्याला फार सुंदर प्रतिसाद दिला. त्यांच्या या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आहे. यातील अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.