गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाला धरून खूप चर्चा झाल्या. अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो की तिच्या फॅशनिस्टा असण्याची चर्चा असो. आता तिच्याबद्दलच्या चर्चांमध्ये अजून एका गोष्टीची भर पडली आहे. अमृताला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग फार आवडतो हे तर तिच्या चाहत्यांना माहितीच आहे. जिच्या सौंदर्यावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा आहे अशी ही मराठीची स्टार अभिनेत्री अमृता मात्र बॉलिवूडच्या खिल्जीची अर्थात रणवीर सिंगची दिवानी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अमृताला आमंत्रित करण्यात आले होते. याच कार्यक्रमाला रणवीरनेही हजेरी लावली होती. रणवीरही त्या कार्यक्रमात येतोय हे जेव्हा अमृताला समजले तेव्हा त्याला भेटण्यासाठी ती फार उत्सुक होती. रणवीरलाही अमृताचं त्याच्यासाठीचं वेड बहुधा माहित असावं. म्हणूनच की काय तो स्वतः अमृताला तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये भेटायला गेला. यावेळी दोघांनी अनेक विषयांवर गप्पा तर मारल्याच शिवाय खलीबली गाण्यावर डान्सही केला. अमृताने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. काही तासांतच या व्हिडिओला लाखो लाइक्स मिळाले असून अनेक कमेंटही आल्या आहेत.

रणवीरने फक्त अमृतासोबतच डान्स केला असे नाही तर अमृताच्या आईसोबतही तो थिरकताना दिसला. हे व्हिडिओ पाहताना, आपल्या सभोवतालच्या लोकांना आपलं करण्यात रणवीरचा हात कोणीच धरू शकत नाही हेच खरं. अमृताच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, नुकतेच तिने ‘डीआयडी’ या डान्स रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले होते. लवकरच ती मेघना गुलझार यांच्या ‘रांझी’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar and ranveer singh dancing on padmaavat khalibali song
First published on: 21-02-2018 at 01:27 IST