मराठी कलाविश्वात एक काळ गाजवणारे, मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतिक्षित ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात कलाकारांनीच दिग्गज कलाकार उभे केले आहेत. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन ही तगडी स्टारकास्ट त्यात पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकच्या एका ट्विटने नेटकऱ्यांची उत्सुकता वाढवली आहे. कारण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमृताची झलक दिसते आणि तिची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.

या चित्रपटातील लूक शेअर करत अमृताने ट्विटरवर ओळखा पाहू असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे. आणखी एक फोटो तिने कोरिओग्राफर फुलवा खामकरसोबत शेअर केला आहे. कारण चित्रपटातील अमृताच्या गाण्याची कोरिओग्राफी फुलवाने केली आहे. अमृता नेमकी कोणती भूमिका साकारणार यावरून बरेच तर्कवितर्क नेटकऱ्यांकडून लावले जात आहेत. ट्रेलरमधील अमृताचा लूक पाहता अभिनेत्री संध्या यांची भूमिका ती साकारणार असल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे.

Photo : साक्षी तन्वरच्या घरी चिमुकलीचं आगमन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. डॉ. श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, प्राध्यापक वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, प्रभाकर पणशीकर अशा व्यक्तिरेखा चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.