महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. तसेच चांगलं काम करणाऱ्या लोकांचं ते कौतुकही करतात अन् त्यांच्या कामाची दखल घेत त्याबद्दल सोशल मीडियावर शेअरही करतात. नुकतीच त्यांनी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा व त्यांची पत्नी आयआरएस श्रद्धा जोशी यांची भेट घेतली. नुकताच मनोज यांच्या जीवनावर बेतलेला ’12th fail’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

या चित्रपटात मनोज शर्मा यांची भूमिका बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारली. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. नुकताच या चित्रपटासाठी विक्रांतला उत्कृष्ट अभिनयाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या चित्रपटामुळे आयपीएस मनोज शर्मा व त्यांच्या संघर्षाबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागली. आता आनंद महिंद्रा यांनी या दाम्पत्याची भेट घेतल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

आणखी वाचा : ’12th Fail’ फेम अभिनेता झाला बाबा! विक्रांत मेस्सीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

आनंद महिंद्रा यांनी या दोघांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांची स्वाक्षरीदेखील घेतली. यानंतर याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद महिंद्रा म्हणाले, “या दोघांकडे जेव्हा मी त्यांची स्वाक्षरी मागितली तेव्हा ते फार लाजले. पण मनोज शर्मा आयपीएस व श्रद्धा जोशी आयआरएस हे दोघे या देशाचे खरे नायक आहेत. याच दाम्पत्याच्या आयुष्यावर ’12th fail’ हा चित्रपट बेतलेला आहे.”

पुढे आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात, “हेच या देशातील खरे सेलिब्रिटीज आहेत आणि त्यांची स्वाक्षरी ही माझ्यासाठी अनमोल आहे. आज या दोघांना भेटून माझं आयुष्य अधिक समृद्ध झालं आहे अन् माझ्या संपत्तीत भरच पडली आहे.” आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. या पोस्टखाली बऱ्याच लोकांनी या आदर्श जोडप्याचे अन् त्यांच्या जीवनावर बेतलेल्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ’12th fail’ हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला आहे.