श्रेष्ठ समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनाही भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. या दोघांनीही देशात सामाजिक बदल घडवून आणण्यासह महिलांना शिक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर लवकरच एका बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. ‘फुले’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. हा चित्रपट हिंदीतून प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा हे दोघेही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

“पॅक-अपनंतर आम्ही आधी त्यावरचं रक्त काढायचो अन्…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘चंद्रमुखी’च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी हा महात्मा जोतिराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवर प्रतीकने हुबेहुब महात्मा जोतिराव फुले यांच्याप्रमाणेच वेशभूषा केल्याचे दिसत आहेत. तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांचे पात्र साकारत आहेत. या पोस्टरमध्ये पत्रलेखाच्या हातात पुस्तक पाहायला मिळत आहे.

महात्मा फुले यांची आज १९५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने ‘फुले’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण करण्यात आले आहे. हा लूक पाहून अनेकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या व्यतिरिक्त आणखी कोण कोण कलाकार असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हे पोस्टर पाहून अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

“आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसात…”, अभिज्ञा भावेने शेअर केला कर्करोगाशी झुंज देणाऱ्या पतीसोबतचा खास व्हिडीओ

महात्मा जोतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मागास जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant mahadevan film phule first poster release starring patralekha and pratik gandhi as a mahatma jyotirao and savitribai phule nrp
First published on: 11-04-2022 at 12:23 IST