अॅनी अवॉर्ड सोहळ्याला अभिनेत्री अँजेलिना जोली हिनं आपल्या दोन्ही मुलींसोबत उपस्थिती लावली पण, या सोहळ्यात सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली ती अँजेलिनाची ११ वर्षीय मुलगी शिलो. कारण तिच्यामध्ये अनेकांना अँजेलिनाचा पूर्वाश्रमीचा पती ब्रॅड पीटची छोटीशी झलक दिसली. शिलो मुलगी असली तरी तिला मुलांसारखं राहणं पसतं आहे त्यामुळे आईसोबत सूटाबुटात आलेल्या शिलोला पाहून अनेकांना ती लहानपणीच्या ब्रॅट सारखीच दिसली.

शिलोची चेहरेपट्टी, कपड्यांची स्टाईल ब्रॅटशी इतकी मिळते की हे दाम्पत्य वेगळे झाले असले तरी अनेकांना शिलोच्या रुपात ब्रॅटच अँजेलिनाच्या सोबत वावरतोय की काय असा भास होतो. २००८ मध्ये ब्रॅट आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओप्रा विन्फ्रेच्या कार्यक्रमात आला होता. त्यावेळी २ वर्षांची असलेल्या शिलोबद्दल तो भरभरून बोलला होता. शिलोला मुलगा व्हायचं होतं, तिला मुलीसारखं राहायला किंवा तसे कपडे घालायला अजिबात आवडत नाही. ती मुलांचे कपडे घालते इतकंच नाही तर तिने मुलांसारखं दिसता यावं यासाठी आपले केसही मुलांसारखे कापून घेतले असं २०१० मध्ये अँजेलिनानं वॅनिटी फेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

अॅनी अवॉर्डसाठी अँजेलिना आपली मुलगी शिलो आणि झारासोबत आली होती. यावेळी शिलोनं काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.