छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ आहे. इंडियन आयडलचे हे १२ वे पर्व आहे. ‘इंडियन आयडल १२’ सुरू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा शो सतत चर्चेत असतो. सगळ्यांच्या मनात घर करणारी स्पर्धक अंजली गायकवाड शो मधून बाहेर पडली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर तिला शोमध्ये परत आणा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

‘इंडियन आयडल’चा तो एपिसोड प्रदर्शित झाल्यापासून अंजलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अंजलीला पुन्हा शो मध्ये आणा अशी मागणी केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “या कठीणकाळात एखादा फोन कॉल, सोशल मीडियावर येणारी प्रत्येक पोस्ट पाहून भीती वाटते, कारण त्यात काय असेल हे कोणालाच माहित नाही. त्यात हे एक तासाचं संगीत आम्हाला पुन्हा आम्हाला त्या जुन्या काळात घेऊन जातं, यापैकी कोणत्याही मुलाचं एलिमिनेशन व्हायला नको कमीत कमी अंजली गायकवाडचं नाही, तिला परत आणा”, असे ट्वीट करत नेटकऱ्याने अंजलीला परत आणा अशी मागणी केली आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, “इंडियन आयडलचा सर्वात चुकीचा निर्णय,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अंजलीला परत आणा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडची थीम ही झीनत अमान स्पेशल होती. ‘इंडियन आयडल’ मधील स्पर्धक झीनत अमान यांचे अनेक लोकप्रिय गाणी गाताना दिसले. हिमेश रेशमिया आणि अनु मलिक हे या एपिसोडचे परिक्षक होते. तर आदित्य नारायण हा या शोचे सुत्रसंचालण करतो.