निया शर्मा आणि अंकिता लोखंडे या टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. नियाने ‘जमाई राजा’ आणि ‘एक हजारों में मेरी बहना है’ या प्रसिद्ध मालिका केल्या आहेत; तर अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून घराघरात प्रसिद्ध झाली आहे. दोघीही अनेकदा एकत्र दिसतात आणि त्यांचे डान्स व्हिडीओ अनेक वेळा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा निया आणि अंकिताने एकत्र डान्स केला आणि तो व्हायरल झाला आहे.
‘लाफ्टर शेफ’मध्ये लोकांना हसवणाऱ्या समर्थ जुरेलने नुकताच त्याचा २५ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान अंकिता लोखंडे आणि निया शर्माही तिथे पोहोचल्या. त्यांच्या आऊटफिटनेच नाही तर त्यांच्या डान्सनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पार्टीचे व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामध्ये अंकिता आणि नियाच्या डान्सची सर्वाधिक चर्चा होत आहे. या दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
यावेळी अंकिता लोखंडे, निया शर्मा आणि विकी जैन यांनी खूप डान्स केला. निया आणि अंकिताने बादशाहच्या ‘वखरा स्वॅग’ या पंजाबी गाण्यावर डान्स केला. दोघींचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक त्यांच्या डान्सवर कमेंट करून सोशल मीडियावर त्यांना ट्रोलदेखील करत आहेत.
अंकिता लोखंडेचे आणखी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यापैकी एका व्हिडीओमध्ये ती भारती सिंगसोबत डान्स करताना दिसत आहे. लोक भारती सिंगचे कौतुक करत आहेत.
अंकिता आणि विक्कीने समर्थचा वाढदिवस त्यांच्या मुंबईतील घरी साजरा केला. एका व्हिडीओमध्ये समर्थ, ज्याला प्रेमाने ‘चिंटू’ म्हणतात, तो केक कापताना दिसत आहे. समर्थच्या या खास दिवशी करण वीर मेहरा आणि एल्विश यादवसारखे स्टार्सही उपस्थित होते.
अंकिता, विकी, समर्थ आणि एल्विश सध्या ‘लाफ्टर शेफ सीझन २’मध्ये दिसत आहेत. या शोमध्ये कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, निया शर्मा, सुदेश लेहरी, अली गोनी, करण कुंद्रा, रुबिना दिलैक आणि राहुल वैद्यदेखील आहेत. यापूर्वी अंकिता, विकी आणि समर्थ ‘बिग बॉस १७’मध्येही दिसले होते.