अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोट आणि हटके व्हिडीओ शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते. अनेकदा अंकिताला तिच्या काही पोस्टमुळे ट्रोलही व्हावं लागलं आहे.
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यावेळी मात्र हे व्हिडीओ तिच्या डान्सचे किंवा मजा मस्तीचे नसून घरातील एका सोहळ्याचे आहेत. या सोहळ्यासाठी अंकिताच्या घरी एक खास पाहुणीदेखील आली होती. अंकिताच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्तानं अंकिताने आई-वडिलांना एक सरप्राइज दिलं होतं. अंकिताने तृतियपंथी पूजा शर्माला घरी बोलावलं होतं. पूजासोबत अंकिताने काहीशा वेगळ्या अंदाजात आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ अंकिताने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
View this post on Instagram
अंकिताचा हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील एका व्हीडीओत पूजा शर्मासोबत अंकिता आणि तिचे कुटुंबीय धमाल करताना दिसत आहेत. पूजाने अंकिताच्या आई-वडिलांची नजर काढली .त्यानंतर सगळ्यांनी गाण्यावर ठेका धरत डान्स केला. सगळ्यांची या खास दिवसासाठी सुंदर लूक केल्याचं दिसतंय. अंकितादेखील साडीमध्ये उठून दिसतेय.
हा व्हिडीओ शेअर करत अंकिताने एख सुंदर कॅप्शनही दिलंय. “आतापर्यंतची सर्वात सुंदर लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी.. प्रिय पूजा रेखा शर्मा ताई.. घरी आल्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद. कालची रात्र मी कधीच विसरु शकत नाही. तुझ्याबद्दल सांगण्यासारख खूप आहे पण माझे शब्ध अपुरे पडतायत.तू मनातूनही अतिशय चांगली आहेस. तू गेल्यानंतर ही तुझी सकारात्मकता माझ्या घरातली प्रत्येक ठिकाणी जाणवत होती. आणि ज्याप्रकारे तू नाचलीस खरंच खूप मजा आली. इतरांबद्दल तुझं प्रेम हे निस्वार्थ आहे. कायम अशीच रहा.” असं म्हणत अंकिताने पूजाचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
तर दुसऱ्या व्हिडीओत पूजाने देखील अंकिताचं भरभरून कौतुक केलं आहे. अंकिता अत्यंत चांगली आणि साधी मुलगी असल्याचं पूजा म्हणाली आहे. अंकिता लोखंडेचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.