अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिचं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अंकिता लोखंडे आता पती विकी जैनसोबतचे फोटो आणि डान्स व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. आताही अंकितानं विकीसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

अंकितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पती विकी जैन डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी ‘दम मारो दम’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मागे सोफ्यावर बसलेला दिसत आहे. जे आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं की, ते कोणीतरी घरातीलच व्यक्ती आहेत. अनेकांना हाच प्रश्न पडला आहे की, या दोघांच्या मागे बसलेली व्यक्ती नक्की आहे तरी कोण. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- “तो माझ्या बाथरुममध्ये…”, ट्रान्सवूमन सायशा शिंदेनं बॉयफ्रेंडबाबत केला धक्कादायक खुलासा

अंकिताच्या या रील व्हिडीओमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘बाबा मागे बसले आहेत ज्यांना या डान्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये.’ तर काही लोकांनी ही व्यक्ती अंकिताचे सासरे असल्याचं म्हणत कमेंट केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘मागे सासरे बसलेत आणि सून पाहा काय करतेय.’ तर आणखी एका युजरनं लिहिलं, ‘माफ कर, पण मागे बसलेले काका तुमचे शो स्टीलर आहेत.’

आणखी वाचा- सबा आझादच्या नव्या फोटोशूटवर हृतिक रोशन फिदा, कमेंट करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी मागच्या वर्षी १४ डिसेंबरला लग्न केलं होतं. त्यावेळी या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरलही झाले होते. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याची बरीच चर्चा झाली होती. एवढंच नाही तर लग्नानंतर विकीनं अंकिताला मालदिवमध्ये एक व्हिला भेट म्हणून दिला होता.