बॉलिवूडमधील अनेक कलाकार लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एकीकडे अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. अंकिता बॉयफ्रेंड विकी जैनशी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अंकिताने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिला भेट म्हणून चप्पल दिल्याचे दिसत आहे. या चप्पलवर ‘Bride to be’ असे लिहिले दिसत आहे. तसेच अंकिता आणि विकी डिसेंबर महिन्यात लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : ‘सूर्यवंशी’मध्ये रोहित शेट्टी कडून झाली मोठी चूक, यूजर्सने केलं ट्रोल

गेल्या काही वर्षांपासून अंकिता विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलीय. यातच आता अंकिता आणि विक्की लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ईटाईम्सच्या वृत्तानुसार अंकिता आणि विक्की १२, १३ आणि १४ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत. त्या दोघांनीही कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण दिले असल्याचे म्हटले जात आहे.