दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पण आता सोशल मीडियावर या चित्रपटामुळे रोहित शेट्टीला ट्रोल केले जात आहे.

सूर्यवंशी चित्रपटात दहशतवाद विरोधी पथकाचा अधिकारी ही महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सिंबा चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदच्या भावाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी रोहित शेट्टीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आधीच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला सूर्यवंशीमध्ये ऑफिसरची भूमिका का दिली असा प्रश्न विचारला आहे.
Video : यूट्यूबर मित्राला दिलेले वचन रोहित शेट्टीने केले पूर्ण, भेटण्यासाठी पोहोचला उल्हासनगरमध्ये

एका यूजरने दोन्ही चित्रपटातील त्या कलाकाराच्या भूमिकेचा फोटो शेअर करत, ‘सिंबा चित्रपटात खलनायकच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सूर्यवंशी चित्रपटात दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आणि आता हे अॅव्हेंजर्स सारखे यूनिवर्स बनवणार. लॉजिक इथे मरण मावले’ या आशयाचे ट्वीट केले आहे.
Sooryavanshi Box Office Collection: ‘सूर्यवंशी’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, तिन दिवसात कमावले इतके कोटी

तर, दुसऱ्या यूजरने अभिनेता सलमान खानच्या टायगर चित्रपटातील एक सीन कॉपी केल्याचे म्हटले आहे. टायगर चित्रपटात दाखवण्यात आलेला अॅक्शन सीन सूर्यवंशी चित्रपटात रोहित शेट्टीने दाखवला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.

५ नोव्हेंबर रोजी सूर्यवंशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिन दिवसात जवळपास ७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.