बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आजवर अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. सध्या ते ‘ऊंचाई’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्यासाठी ते नेपाळमध्ये गेले आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एका मुलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात एक भीक मागणारी मुलगी त्यांच्याकडून पैसे मागत आहे. मात्र तिचे इंग्रजी पाहून अनुपम खेरही थक्क झाले आहेत. त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर म्हणाले, “मी काठमांडूच्या मंदिराबाहेर आरतीला भेटलो. ती मूळ भारतातील राजस्थानमधील आहे. तिने माझ्याकडून पैसे मागितले. तसेच माझ्यासोबत फोटो काढावा अशी मागणी केली. त्यानंतर काही वेळाने ती माझ्याशी उत्तम इंग्रजीत संवाद साधू लागली. यावेळी तिची शिक्षणाप्रतीची आवड पाहून मला प्रचंड आश्चर्य वाटले. यावेळी मी तिच्यासोबत भरपूर गप्पा मारल्या. त्यासोबत तिला अनुपम खेर फाऊंडेशनच्या माध्यामातून शिकवण्याचे आश्वासन दिले,” असे त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एक गरीब, भीक मागणारी मुलगी दिसत आहे. यात ती इंग्रजीत संवाद साधताना म्हणते, “माझे नाव आरती. मी तुम्हाला भेटण्यास फार उत्सुक होती. तुमचे खूप खूप धन्यवाद. मी भारतातील राजस्थानमधील आहे.” हा सर्व संवाद ती इंग्रजीतून साधते. तिचे इंग्रजीतील बोलणे ऐकून अनुपम खेर भारावून जातात. यावेळी अनुपम खेर म्हणाले, “तू खूप चांगले इंग्रजी बोलतेस. तुला इतकी छान इंग्रजी कशी बोलता येते?” असा प्रश्न अनुपम खेर यांनी विचारला.

यावेळी आरती म्हणाली, “मी भीक मागून पोट भरते. मी शाळेत जात नाही. मी भीक मागता मागता थोडे थोडे इंग्रजी शिकले आणि आता मला संपूर्ण इंग्रजी येते.” यावेळी अनुपम यांनी विचारले, “तू भीक का मागतेस? तू काही तरी काम करु शकतेस?”. यावर आरतीने म्हणाली, “मी एका गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे मला भीक मागावी लागते.”

यानंतर अनुपम खेर म्हणतात, “तू इतके चांगले इंग्रजी बोलतेस की तुला कोणीही नोकरी देईल.” यावर आरती म्हणाली, “मला कोणीही नोकरी देत नाही. तू भारतातील आहे, तू इकडे का आलीस?” असे प्रश्न ते विचारतात. तेव्हा अनुपम खेर तिला विचारतात की, “तू भारतातून इथे का आलीस?”. यावर आरती म्हणते की “कारण भारतातही हीच समस्या आहे. पण इथे काहीतरी चांगलं आहे.”

यानंतर अनुपम खेर तिला विचारतात की, “तू भारतात कोणत्या शाळेत शिक्षण घेत होती?”. यावर उत्तर देताना ती म्हणाली की “मी कोणत्याही शाळेत गेलेली नाही. पण मला शाळेत जायला आवडते, मला शाळेत जायचे आहे, कृपया मला शाळेत जाण्यासाठी मदत करा. जर मी शाळेत गेले तर माझे भविष्य बदलेल. मी नेहमी लोकांना शाळेत जाण्यासाठी मदत करायला सांगते. पण कोणीही मला मदत करत नाही,” असे सांगताना ती भावूक झाली.

यानंतर अनुपम यांनी तिचा फोन नंबर घेत तिला शाळेसाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. हे आश्वासन ऐकून आरतीला फार आनंद झाला. “जर मी माझ्या अभ्यासात मेहनत घेतली तर माझे आयुष्य माझे भविष्य नक्की बदलेल,” असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला. दरम्यान अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच अनेक जण आरतीची शिक्षण घेण्याची उत्सुकता आणि इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून थक्क झाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी तिला चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.