scorecardresearch

काश्मिरमधील हत्याकांडाचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत, अनुपम खेर टीका करणाऱ्यांना म्हणाले…

अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

anupam kher, the kashmir files,
अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सध्या विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळत आहे. सामान्य लोकांसोबतच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही या चित्रपटातून समाजात फूट पाडणारे, मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवणारे असल्याचे सांगत आहेत. आता या चित्रपटाला प्रोपोगेंडा ( Propaganda) म्हणणाऱ्यांना अभिनेता अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करत सडेतोड उत्तर दिले आहे.

अनुपम यांनी १९ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये २४ जणांच्या हत्येच्या दुःखद घटनेची एक न्यूज क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या क्लिपमध्ये असे सांगण्यात येत आहे की, संशयित दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले होते, त्यांनी २४ हिंदूंना जबरदस्तीने घरातून बाहेर काढले आणि एका रांगेत उभे राहून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना अल्पसंख्याकांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेत दोन मुले, ११ पुरुष आणि ११महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच आहे. व्हिडिओमध्ये प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे लोक खूप रडताना दिसत आहेत.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही घरजावई? विकी जैनने सांगितलं अंकिता लोखंडेच्या घरी राहण्याचे कारण

आणखी वाचा : “प्रसिद्धी सहन होत नाही, कृपया माझा…”, Viral Video मधील धावणाऱ्या तरुणाची विनंती

हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले की, “हे हत्याकांड १९ वर्षांपूर्वी घडले होते आणि जे लोक काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर वक्तव्य करत आहेत किंवा #TheKashmirFiles ला प्रोपगंडा (Propaganda) फिल्म म्हणत आहेत, त्यांनी एपी न्यूजचा हा व्हिडिओ पाहावा. जेव्हा दहशतवाद्यांनी २४ निरपराधांची निर्घृण हत्या केली. त्यांची माफी मागा, पश्चात्ताप करा, त्या जखमा पून्हा खरडून काढू नका तर त्या भरण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा : चैत्र महिन्यात राशींवर ग्रहांचा असणार शुभ प्रभाव! ‘या’ ५ राशींना होईल लाभ!

दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anupam kher shared a video of real massacre happened 19 years back for those who calling the kashmir files is propaganda film dcp

ताज्या बातम्या