‘अनुपमा’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. रुपाली सध्या त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. रुपाली गांगुली यांच्याविषयी सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत.

रुपाली गांगुली यांनी नुकतेच त्यांचे मुंबईतील घर दाखवले. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या घरात सगळीकडे हिरवळ दिसत होती. खरंतर, रूपाली म्हणाल्या की त्यांना जंगलात राहायचे होते, म्हणून त्यांचे पती अश्विन यांनी जंगल मुंबईत आणले.

पण, आता रुपाली या घरात राहात नाहीत, त्या एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्या आहेत. रुपाली यांच्या घरात अनेक पाळीव कुत्रे आहेत, ज्यांचे नाव त्यांनी स्वतः ठेवले आहे. एकाचे नाव रायसिन आणि दुसऱ्याचे नाव मस्ती आहे. होम टूरदरम्यान त्यांच्या पाळीव कुत्र्यांना दाखवताना रुपाली म्हणाल्या की, हे या मुलांचे घर आहे.

भटक्या कुत्र्यांसाठी जेवण बनवले जाते

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, तिच्या घरात एक आउटडोर किचन आहे. या स्वयंपाकघरातून अनेक भटक्या कुत्र्यांसाठी जेवण बनवले जाते. रुपाली म्हणाल्या की, माझा एक रिक्षाचालक राम भाई आहे आणि माझा एक नोकर आहे, जे दररोज भटक्या कुत्र्यांसाठी जेवण पाठवतात. हे त्यांचे घर आहे.

रुपाली यांना छोटी घरे आवडतात

रुपाली म्हणाल्या की, त्यांच्या घरात बहुतेक गोष्टी रिसायकल केलेल्या मटेरियलपासून बनवल्या जातात, मग ते सोफा असो किंवा टेबल. रुपाली पुढे म्हणाल्या की त्यांना छोटी घरे आवडतात, त्या ज्या फ्लॅटमध्ये राहतात तो देखील २ बीएचकेचा आहे.

मोठे घर असल्याने लोकांमध्ये अंतर निर्माण होते असे अभिनेत्रीचे मत आहे. रुपाली गांगुली अनेकदा प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध आवाज उठवते. अभिनेत्रीने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना पाठिंबा दर्शविला आहे. व्हिडीओमध्ये रुपाली म्हणत असल्याचे दिसून आले आहे की, हा देश त्यांचाही आहे, ही पृथ्वीही त्यांची आहे, म्हणून सर्व जण प्रेमाने एकत्र राहतात.