Anupamaa मालिकेत नवा ट्विस्ट! परितोष बनणार अनुपमाचा शत्रू, स्वतःच्या आईलाच.... | Anupamaa new episode Paritosh Becomes Enemy Of His Own Mother | Loksatta

Anupamaa मालिकेत नवा ट्विस्ट! परितोष बनणार अनुपमाचा शत्रू, स्वतःच्या आईलाच….

‘अनुपमा’मध्ये एकापाठोपाठ एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

Anupamaa मालिकेत नवा ट्विस्ट! परितोष बनणार अनुपमाचा शत्रू, स्वतःच्या आईलाच….
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

स्टार प्लस वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मध्ये एकापाठोपाठ एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. परितोष म्हणजेच अनुपमाचा मुलगा तोषूने आधी आपल्या पत्नीची फसवणूक केली आणि आता तो त्याच्या आईचा शत्रू झाला आहे. तोषूला वाटतंय की अनुपमाच्या चुकीमुळे तो किंजलपासून वेगळा झालाय. अनुपमाच्या आगामी एपिसोडमध्ये परितोष त्याच्या आईला दोष देईल आणि बा देखील अनुपमाला बरं वाईट बोलेल, असं दाखवलं जाणार आहे.

आगामी एपिसोड्समध्ये दाखवण्यात येणार आहे की, बा, परितोष आणि किंजलच्या चिंतेत असणार आहेत. वनराज, पाखी आणि समर बा ला समजावतील. वनराज आणि समर तोषूला शोधण्यासाठी बाहेर पडतील, पण त्यांना तो सापडणार नाही. या सर्वांमुळे चिंतेत असलेली अनुपमा देखील शाह निवासवर पोहोचेल आणि बा तिला सर्व गोष्टींसाठी दोष देतील.

याच दरम्यान, तोषूदेखील नशेत घरी पोहोचेल आणि आपल्या मुलीला जवळ घेईल. पण नशेत असलेल्या तोषूच्या हातून मुलगी पडणार इतक्यात किंजल तिला वाचवेल. हे पाहून अनुजला राग येईल आणि तो तोषूला दूर ढकलून देईल. तोषू त्याच्या आईला वाईट बोलेल आणि चाकूने स्वतःला मारण्याची धमकी देईल. अनुपमा त्याला सांभाळेल आणि तोषू अनुपमाला बोलल्यानंतर तिथून निघून जाईल.

दुसरीकडे अनुजला बरखा आणि अंकुशने केलेल्या घोटाळ्याची माहिती मिळेल. त्याच्या गैरहजेरीत या दोघांनी ऑफिसमधील अनेक प्रकल्पात घोटाळा केल्याचे त्याला समजेल. तो अंकुशला त्याच्याबरोबर ऑफिसला जायला सांगेल आणि सर्व पाहून बरखा घाबरेल. पुढच्या एपिसोडमध्ये तोषू आपल्या आईचे आयुष्य वेगवेगळ्या प्रकारे खराब करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तुम्हाला दिसेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हिंदी चित्रपटांच्या सद्यस्थितीवर केलं भाष्य; म्हणाले, “मला कायम चिंता…”

संबंधित बातम्या

नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा
विकी कौशलच्या नावाने फेसबुकवर फसवणूक, तरुणी थेट पोहोचली अभिनेत्याच्या घरी अन्…
“काका, तुम्ही खूप काही दिलंत…”; विक्रम गोखले यांच्या आठवणीत श्रेया बुगडे भावूक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ठराविक उद्योजकांना खूश करण्यासाठी प्लास्टिकवरील निर्बंध शिथिलच पर्यावरणप्रेमींचा आरोप
‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती; निती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेत ठाण्याचे विकासक अजय आशर
डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश