बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या तिच्या कामापेक्षा भारतीय खेळाडू विराट कोहलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल अधिक चर्चेत आहे. विराट कोहलीच्या चांगल्या आणि वाईट खेळीसाठी अनुष्कालाच कारणीभूत मानून तिची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवली जातेय. पण, याकडे लक्ष न देता अनुष्का तिच्या कामात व्यस्त झाली आहे.
सध्या अनुष्का करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटासाठी राजस्थानला पोहचली आहे. या चित्रपटामध्ये एक विवाह दृश्य असून त्यात अनुष्का नवरीच्या पोशाखात दिसणार असल्याचे वृत्त मिड डेने दिले आहे. अनुष्का आणि रणबीर कपूर व्यतिरीक्त या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
वधूच्या वेशात अनुष्का!
विराटच्या खेळीसाठी अनुष्काची सोशल मिडियावर बरीच खिल्ली उडवली जाते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 05-04-2016 at 09:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma dresses up as a bride