बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘एनएच १०’ या चित्रपटासाठी जयपूर शहरात चित्रीकरण करत आहे. यावेळी चित्रीकरणाच्या ठिकाणी ‘एनएच १०’ च्या टीमला अचानकपणे आलेल्या वादळाचा सामना कराव लागला. एकीकडे या वादळामुळे ‘एनएच १०’चे चित्रीकरण थांबले आहे, तर दुसरीकडे चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शर्माने या वादळाचा चांगलाच धसका घेतला आहे. या वादळा दरम्यान आलेला अनुभव अनुष्काने ट्विटरवर सांगितला आहे. अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे व्हेल्व्हेट’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून अनुष्का नुकतीच राजस्थानमध्ये ‘एनएच १०’ च्या चित्रीकरणासाठी दाखल झाली होती. नवदीप सिंग यांचे दिग्दर्शन असलेला ‘एनएच १०’ हा एका वेगळ्या धाटणीचा थरारपट असून प्रेक्षकांना त्याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या १२ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘एनएच १०’चे चित्रीकरण सुरू असताना अनुष्काला भेटण्यासाठी तिचा तथाकथित प्रियकर विराट कोहली जयपूर विमानतळावर येऊन गेला असल्याचीसुद्धा माहिती मिळत आहे.
We encountered a massive sand storm on d set of #NH10 yesterday.Very scary.But everyone is OK.Just very dirty & sandy(if tat’s even a word)
— ANUSHKA SHARMA (@AnushkaSharma) April 18, 2014
True to being film people we took pictures of the ‘survivors’ 😉 …. Jokes apart .. Glad No one was injured . pic.twitter.com/xdsqyiZWtk
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANUSHKA SHARMA (@AnushkaSharma) April 18, 2014