बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अपारशक्तीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड असलेल्या ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर आहे.

अपारशक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अपारशक्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि भारतीय क्रिकेटर यजुर्वेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा चहल दिसत आहे. अपारशक्ति हा धनश्रीसोबत ‘बचपन का प्यार’ या गाण्याच्या पंजाबी व्हर्जनवर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘हे गाणं विसरू शकतं नाही, आता या गाण्याचं पंजाबी व्हर्जन पाहा,’ अशा आशयाचे कॅप्शन अपारशक्तीने दिले आहे.

आणखी वाचा : रौप्य पदक विजेत्या मिराबाई चानू यांना जमिनीवर बसून जेवताना पाहून आर माधवन म्हणाला…

‘बचपन का प्यार’ या गाण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत सहदेव दिरदो आहे. हा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, सहदेव दिरदोचा हा व्हिडीओ २०१९ मध्ये त्याच्या शाळेतील एका शिक्षकाने शेअर केला होता. आता या गाण्याचे पंजाबी, भोजपूर आणि अनेक भाषांमध्ये व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

दरम्यान, अपारशक्तीने बॉलिवूडचा पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘बद्रीनाथ की दुल्हिनया’, ‘स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘जबारिया जोडी’, ‘बाला’ आणि ‘पति पत्नी और वो’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.