Archana Puran Singh gets scammed in online ticketing during vacation with family : अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आता त्यांच्या कुटुंबासह एक यूट्यूब चॅनल चालवतात. त्या त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अद्ययावतपणे त्यांच्या चाहत्यांना देत असतात. त्यांची दोन्ही मुले आणि अभिनेता पती परमित सेठी त्यांना या कामात साथ देतात.

आता अभिनेत्रीने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे आणि चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्यांच्या दुबई ट्रिपमध्ये त्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबासह स्कायडायव्हिंगसाठी तिकिटे बुक केली होती; पण जेव्हा त्या काउंटरवर पोहोचल्या तेव्हा त्यांना कळले की त्यांची फसवणूक झाली आहे.

अर्चना पूरण सिंह यांची झाली फसवणूक

अर्चना त्यांच्या व्लॉगमध्ये म्हणतात की, त्यांनी आयफ्लाय दुबईमध्ये इनडोअर स्कायडायव्हिंगसाठी तीन स्लॉट बुक केले होते. पण जेव्हा त्या तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या नावावर कोणतेही बुकिंग नाही. अर्चना व्हिडीओमध्ये म्हणतात, “आम्ही तीन स्लॉट बुक केले होते, पण ही महिला म्हणत आहे की, आमच्याकडे कोणतेही बुकिंग नाही. आमची फसवणूक झाली आहे, ज्या वेबसाइटवरून आम्ही पैसे दिले होते, ती खरी नव्हती. आम्ही दुबईमध्ये आमचे पैसे गमावले. दुबईसारख्या शहरात हे घडले यावर माझा विश्वास बसत नाही, जिथे इतके कडक कायदे आहेत.” या घटनेने परमित सेठीलादेखील धक्का बसला. तो म्हणाला, “हजारो रुपये गेले आहेत आणि आता मला वाटते की हादेखील एक स्कॅम आहे.”

मुलगा आर्यमन म्हणाला की, बुकिंग करताना त्याला शंका होती. कारण- सुरुवातीला वेबसाइटवर स्कायडायव्हिंगचा वेळ ४ मिनिटे दाखवण्यात आला होता. नंतर दुसऱ्या पानावर त्याची वेळ २ मिनिटे दाखविण्यात आली; पण त्याने पुन्हा त्याबाबत तपासून पाहिले नाही. कारण- त्याला वाटले की, मुख्य वेबसाइटवर कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही. कुटुंबाने तिकिटे बुक करताना खूप पैसे खर्च केले होते; जे आता वाया गेले आहेत.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अर्चना अलीकडेच ‘नादानियां’मध्ये मिसेस ब्रागांझा मल्होत्राच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्याच वेळी त्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये नवजोत सिंह सिद्धू यांच्याबरोबर दिसल्या आहेत. आता त्या त्यांच्या मुलांबरोबर YouTube व्हिडीओंमध्ये जास्त दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.