ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसिलाओस डेमेट्रिएड्सच्या ताब्यातून गोव्यात ड्रग्स जप्त केले आहेत. अगिसिलाओसला न्यायालयात हजर करण्यात आले आणि आता त्याला २ आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता यावर अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुन सध्या लंडनमध्ये त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. अर्जुनने अगिसिलाओसच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रिय मित्रांनो, ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसला आहे. हे दुर्देवी आहे की माझा काहीही संबंध नसला तरी माझे नाव प्रत्येक बातमीमध्ये ओढले जात आहे. मी आणि माझं कुटुंब चर्चेत आहे, माझे कुटुंब आणि मी कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत आणि या घटनेत माझ्या जोडीदाराचा हा नातेवाईक आहे, त्या व्यक्तीशी माझा याशिवाय दुसरा कोणताही संबंध नाही.’

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

पुढे अर्जुन म्हणाला, ‘मी मीडियाला विनंती करतो की माझे नाव वापरून हेडलाईन्स बनवू नका. कारण आमचा संबंध नाही आणि यामुळे माझ्या स्वतःच्या कुटुंबाला आणि माझ्याशी संबंध असलेल्या लोकांसाठी दुखापत होत आहेत. आपल्या कायदेशीर व्यवस्थेवर माझा विश्वास आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी ३’ तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात इंदुरीकर महाराजावरून वाद

पुढे अर्जुन म्हणाला, ‘माझे आणि माझ्या जोडीदाराचे नाव अशा गोष्टीशी जोडू नका, अशी मी विनंती करतो. कारण आमचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. न्यायव्यवस्थेला त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. ज्या लोकांनी माझे समर्थन केले त्यांचा मी आभारी आहे.’